Surprise Me!

Bondarwadi Dam | बोंडारवाडी धरणाचा प्रश्‍न वर्षभरात सोडवू - Bharat Patankar | Sakal Media

2021-12-12 1,887 Dailymotion

Bondarwadi Dam | बोंडारवाडी धरणाचा प्रश्‍न वर्षभरात सोडवू - Bharat Patankar | Sakal Media<br />केळघर : मेढा-केळघर विभागातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्त्‍वाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने बोंडारवाडी धरणाचा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने नांदगणे येथे ५४ गावांतील ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य चैतन्य दळवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित कदम, भाऊसाहेब उभे, एकनाथ ओंबळे, राजेंद्र धनावडे, आनंदराव जुनघरे, आनंदराव सपकाळ उपस्थित होते. (व्हिडिओ : संदीप गाडवे)<br />#BondarwadiDam #BharatPatankar #Bondarwadidamwaterissue #Water

Buy Now on CodeCanyon